background

About Us

. संस्थेचे ध्येय व उद्देश :-

१. सभासदांची तसेच सर्वसामान्य जनतेची सर्वांगीण प्रगती व कल्याण साधण्यासाठी सामाजिक जागृती करणे, त्यासाठी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहणे.

२. संस्थेमार्फत धर्मशाळा, आश्रमशाळा, वसतीगृहे उभारणे, त्यांची देखभाल करणे. तेथे येणाऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा करणे.

३. विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करणे. कलाकारांच्या कलागुणांना वाव देणे. परिसरात आरोग्य शिबीरे, नेत्रचिकीत्सा शिबीरे, रक्तदान शिबीरे आयोजित करणे.

४. या परिसरातील रहिवाशांच्या समस्या तसेच अडीअडचणी सनदशिर मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करणे. तसेच सुशोभिकरण करुन स्वच्छतेचे महत्व लोकांपर्यंत पोहजवणे.

५. परिसरातील मुलांकरिता बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा विद्यालय, डी.एड. बी.एड. महाविद्यालय, बालवाडी मार्गदर्शन केंद्रे, तांत्रिक विद्यालय, कलाकेंद…

६. परिसरातील गरीब व गरजू मुलांना मोफत वह्या, पुस्तके, गणवेश यांचे वाटप करणे, हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार करणे.

७. पूरग्रस्त, आपदग्रस्त, दंगलग्रस्त नागरिकांना जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे व नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना मदत करणे

८. गरजू व गरीब व्यक्तींना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे, मोफत औषधोपचार करणे, रुग्णवाहिका खरेदी करणे.

९. वृद्धाश्रम, अनाथआश्रम, बालसंगोपन केंद्र, सैनिकी शाळा, अपंगांसाठी शाळा इ. चालविणे.

१०. बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.

११. तरूणांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी देशी-विदेशी खेळांची शिबीरे आयोजित करणे, विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करणे व त्यमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंचा यथेचित गौरव करणे व त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच सभासदांना मैदानी खेळ, स्पर्धा उदा. खो-खो, कबड्डी, टेनिस, धावण्यांच्या शर्यती वगैरे तसेच बैठे खेळ बुद्धीबळ, कॅरम यासारख्या खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे किंवा अन्य ठिकाणी जाऊन स्पर्धेत भाग घेणे.

१२. या परिसरातील मुला-मुलींच्या शारिरीक व मानसिक उत्कर्षाकरिता विविध वैद्यकीय खेळांचे व शारिरिक खेळांचे प्रशिक्षण देणारी शिबीरे भरविणे.

१३. या परिसरातील स्त्री पुरूषांकरिता तसेच मुला मुलींकरिता व्यायामशाळा, जिमनॅशिअम, तरण तलाव इत्यादींची स्थापना करणे

१४. विविध सण साजरे करणे. उदा. शिवजंयती, थोर पुरुषांच्या जयंत्या तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कोजागीरी पौर्णिमा, गोकुळाष्टमी तसेच २६ जानेवारी, १५ ऑगस्ट इ. राष्ट्रीय सण साजरे करणे.

१५. महिलांसाठी हळदी-कुंकु समारभं, सहली, भजन, किर्तन, महापुजा आयोजित करणे.

१६. विविध खेळाच्या स्पर्धा आयोजित करणे.

१७. परिसरात वाचनालय, ग्रंथालय अभ्यासिका स्थापन करणे.

१८. परिसरात मंडळातर्फे आरोग्य शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिरे, रक्तदान शबिरे आयोजित करणे. शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला पोहोचविणे

१९. महिलांना बचत गटाची माहिती देणे.

२०. कार्यकारी मंडळ वेळोवेळी ठरविलेले अशा धर्मादाय स्वरुपाचे उद्देश राबिवणे.

२१. धार्मिक कार्यासबंधी विविध कार्यक्रम आयोजित करणे.

about

TOTAL OUR VOLUNTEERS

1000

OUR BENEFICIARIES

1505

डॉ श्यामसुंदर रामलोलालख पांडे
- राष्ट्रीय उपाध्यक्ष

श्रीमती पूजा सचिन सुर्वे
- खजिनदार

श्री रोहित सचिन सुर्वे
- राष्ट्रीय सचिव